काल तुला भेटताना माझ्या मनाला खुप बरं वाटलं
काल तुला भेटताना माझ्या मनाला खुप बरं वाटलं,
मी प्रेम करतो तुझ्यावर हे स्वप्न नाही सत्य आहे हे मला पटलं..
तुला निहाळून पाहताना मन माझं गालातल्या गालात हसलं,
तुला लाजताना पाहून मला ही लाजावसं वाटलं..
तु फक्त माझीचं आहे हे मला खरोखरचं पटलं,
तु आणि फक्त तुचं आहेस माझ्या जिवनात हे ह्रदयावरही मी कोरलं..
येऊन तुझ्या मिठीत मला स्वर्गात असल्यासारखं वाटलं,
सोज्वळ निरागस निस्सम गोंडस रुप तुझे माझ्या डोळ्यात साठलं..
ही कविता लिहताना मी फक्त आणि फक्त पिल्लू तुलाचं आठवलं,
पण ?????
जेव्हा वेळ आली आपल्या दुरावण्याची,
त्यावेळी माझ्या डोळ्यात नकळत पाणी दाटलं..
त्यावेळी माझ्या डोळ्यात नकळत पाणी दाटलं..



Comments
Post a Comment