कुणाच्या असण्याचा आणि नसण्याचा......
कुणाच्या असण्याचा आणि नसण्याचा
कधी अश्रु तर कधी हसण्याचा
वर्तमानाला भुतकाळाची साथ
आठवणी फक्त आठवणी असतात
भविष्याचा ताप, भुतकाळाची चाप
दिवसभर नुसता याचा त्याचा व्याप
समोरचा विचार आणि सुटलेला थरकाप
वर्तमानात फक्त आठवणी असतात
गेलेली वाट डोंगराहुन बघण्याचा
टोकावर उभे राहून गाव शोधण्याचा
नागमोडी वाट आणि डोंगराचा घाट
आकाशाहून फक्त आता आठवणी दिसतात
उचकी आली तर आठवण झाली
याने की त्याने कुणी असेल केली
आठवणीचे वारे कुठवर शिरतात
दिवसाला फक्त आठवणी असतात
आठवणीमध्ये रमण्याचा वेळ ना काळ
अख्ख जग फिरून आलो तरी आठवण हजार
आठवणीची दुनियाच वेगळी निराळी
कधी मनं येई भरून तर कधी खाली
शेवटाला आणखी काय असतात ?
आठवणी फक्त आठवणी असतात
कधी अश्रु तर कधी हसण्याचा
वर्तमानाला भुतकाळाची साथ
आठवणी फक्त आठवणी असतात
भविष्याचा ताप, भुतकाळाची चाप
दिवसभर नुसता याचा त्याचा व्याप
समोरचा विचार आणि सुटलेला थरकाप
वर्तमानात फक्त आठवणी असतात
गेलेली वाट डोंगराहुन बघण्याचा
टोकावर उभे राहून गाव शोधण्याचा
नागमोडी वाट आणि डोंगराचा घाट
आकाशाहून फक्त आता आठवणी दिसतात
उचकी आली तर आठवण झाली
याने की त्याने कुणी असेल केली
आठवणीचे वारे कुठवर शिरतात
दिवसाला फक्त आठवणी असतात
आठवणीमध्ये रमण्याचा वेळ ना काळ
अख्ख जग फिरून आलो तरी आठवण हजार
आठवणीची दुनियाच वेगळी निराळी
कधी मनं येई भरून तर कधी खाली
शेवटाला आणखी काय असतात ?
आठवणी फक्त आठवणी असतात



Comments
Post a Comment